Site icon कार्यारंभ लाईव्ह

पोलीस कर्मचार्‍याने परळीतील उड्डाणपूलावरुन मारली उडी!

echo adrotate_group(3);

परळी दि.18 : संभाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचार्‍याने परळीतील उड्डाणपूलावरुन उडी मारली. ही खळबळजनक घटना सोमवारी रात्री 8.15 वा.सुमारास घडली आहे. कर्मचार्‍याने उडी का मारली? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान घटनास्थळी पोलीस अधिकारी, कर्मचारी पोहचले आहेत. हा कर्मचारी गंभीर जखमी असुन उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.
सुनील घोळवे असे पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे. परळी संभाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांची नियुक्ती आहे. सोमवारी (दि.18) सायंकाळच्या सुमारास घोळवे यांनी शहरातील उड्डाणपुलावर दुचाकी उभी केली. त्यानंतर पुलावरुन खाली उडी मारली. यामध्ये ते जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या पायाला गंभीर जखम झाल्यामुळे लातुर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.echo adrotate_group(6); echo adrotate_group(10);echo adrotate_group(8);

Exit mobile version