क्राईम

वडवणी न.प.च्या मुख्याधिकार्‍यास मारहाण

By Keshav Kadam

January 19, 2021

बीड दि.19 : किरकोळ वादातून इंजिनिअरने वडवणी न.प.च्या मुख्याधिकार्‍यास बेदम मारहाण केली. हा प्रकार मंगळवारी (दि.19) सायंकाळच्या सुमारास घडला. या प्रकरणी जखमी मुख्याधिकारी यांना उपचारसाठी रुग्णालात हलवण्यात आले आहे. वडवणी न.प.चे मुख्याधिकारी पाटील यांना एका इंजिनिअरने मारहाण केली. यामध्ये त्यांच्या हाताला गंभीर जखम झाली आहे. घटनास्थळी वडवणी पोलीसांनी धाव घेत जखमी पाटील यांना उपचारासाठी वडवणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.