न्यूज ऑफ द डे

धनंजय मुंडेंविरोधातील रेणू शर्माची तक्रार मागे

By Karyarambh Team

January 22, 2021

echo adrotate_group(3);

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना रेणू शर्मा प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. ज्या महिलेने धनंजय मुंडेंवर बलात्काराची तक्रारार केली होती आणि धनंजय मुंडे अडचणीत आले होते. त्याच तक्रारारदार महिलेने आता यू-टर्न मारत आपली तक्रार मागे घेतली आहे. रेणू शर्माने लेखी अर्ज देवून आपली तक्रार मागे घेतली आहे.echo adrotate_group(6);

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणू शर्मा हिने आपली तक्रार मागे घेतली आहे. पण पुन्हा ती तक्रार मागे घेण्यावरुन मागे फिरु नये म्हणजेच मी तक्रार मागे घेतली नाही असा दावा करू नये या करता पोलिसांनी तिला आपले म्हणणे प्रतिज्ञापत्राद्वारे देण्यास पोलिसांनी सांगितले होते. त्यानुसार, रेणू शर्मा हिने आपली तक्रार मागे घेतली असे ते प्रतिज्ञापत्र तिने मुंबई पोलिसांना दिले आहे.  एका वरीष्ठ अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर या माहितीला दुजोरा दिला.“मी केलेली तक्रार काही कारणास्तव मी मागे घेत आहे” असं प्रतिज्ञपत्र रेणू शर्मा हिने पोलिसांना दिले आहे. तर या प्रकरणातील रेणू शर्माचे वकील यांनी काही दिवसांपूर्वीच काही खाजगी कारण सांगत रेणू शर्माची केस त्यांनी सोडली होती. त्यानंतर आता रेणू शर्मानेच तक्रार मागे घेतली त्यामुळे धनंजय मुंडेंना मोठा दिलासा मिळाला आहे.echo adrotate_group(8); echo adrotate_group(10);echo adrotate_group(9);