क्राईम

बीडमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला!

By Keshav Kadam

January 28, 2021

बीड दि.28 : शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यावर हल्ला केल्याची घटना गुरुवारी (दि.28) रात्रीच्या सुमारास घडली. जखमी पदाधिकाऱ्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. परमेश्वर सातपुते असे जखमी पदाधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे शिवसेना किसान सेनेचे पद आहे. गुरुवारी रात्री शहरातील स्वराज्यनगर परिसरात त्यांच्या गाडीवर अज्ञातानी हल्ला केला. यामध्ये गाडीची तोडफोड केली असून त्यांनाही मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.