क्राईम

परराज्यातील चार लाखाची विदेशी दारू बीडमध्ये पकडली

By Keshav Kadam

January 31, 2021

echo adrotate_group(3);

echo adrotate_group(7);

बीड दि.31 : शिरुर कासार तालुक्यातील पिंपळनेर येथे गोवा राज्यात निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असणाऱ्या विदेशी मद्याच्या 50 पेट्यांचा साठा जप्त केला. महाराष्ट्र राज्यातील दराप्रमाणे जप्त केलेल्या दारुची एकूण किंमत रुपये 3 लाख 64 हजार 800 इतकी आहे. ही कारवाई 31 जानेवारी रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बीड व अहमदनगर जिल्ह्यांच्या संयुक्त पथकाने रात्री 12.30 वाजताच्या सुमारास केली.आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई श्री कांतीलाल उमाप व पुणे विभागाचे विभागीय उप-आयुक्त श्री प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली खात्रीलायक बातमीनुसार अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बीड नितिन धार्मिक यांचे नेतृत्वाखाली बीड व अहमदनगर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी संयुक्तपणे शिरुर कासार तालुक्यातील पिंपळनेर गावातील रामराव कृष्णाजी जायभाये याच्या घरात रात्री 12.30 वाजता धाड टाकली. त्याचे घरातून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला गोवा राज्याच्या बनावटीचा विदेशी मद्याचा साठा आढळून आला. रामराव कृष्णाजी जायभाये या इसमास अटक करुन त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 च्या कलम 65 (अ)(ई), 83 व 108 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला. तसेच गोवा राज्याची दारु चोरी छुप्या पद्धतीने महाराष्ट्रात आणून अवैधरीत्या विक्री करण्याच्या उद्देशाने आणल्याचे तपासात निदर्शनास आल्याने आरोपीचा मुलगा बाळासाहेब रामराव जायभाये याचेविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला. धाड पडल्याची माहिती मिळताच तो पसार झाल्याने त्याला फरार घोषित करुन त्याचा शोध सुरु आहे. तसेच यामागे असलेल्या सूत्रधाराचाही शोध राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून घेण्यात येत आहे. सदर कारवाईत निरिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बीड श्री डि.एल.दिंडकर, जवान सांगुळे, वाहनचालक शेळके व अहमदनगर जिल्ह्यातील निरिक्षक श्री बनकर, निरिक्षक श्री घोरतळे, दुय्यम निरिक्षक श्री बडदे, श्री सूर्यवंशी, श्री धोका, श्री ठोकळ, श्री बारावकर व त्यांचेसोबत जवान ठुबे, वामने, बिटके, कांबळे, बटुळे व महिला जवान श्रीमती आठरे यांनी सहभाग नोंदविला.echo adrotate_group(5);

अवैध व बनावट मद्याची विक्री होत असल्यास माहिती द्यावीनागरिकांनी त्यांच्या परिसरात अवैध व बनावट मद्याची विक्री होत असल्यास त्याबाबतची माहिती या विभागाला द्यावी, माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येऊन अशा अवैध दारु विक्रेत्यांवर ठोस कारवाई केली जाईल, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बीड यांनी केले आहे.echo adrotate_group(9); echo adrotate_group(10);