न्यूज ऑफ द डे

बीडमध्ये उद्या ‘स्वाभीमान’चे भर रस्त्यावर ‘झोपा काढो’

By Karyarambh Team

February 14, 2021

echo adrotate_group(3);

जिल्हाध्यक्ष प्रा.सचिन उबाळेंचे अनोखे आंदोलन बीड : बीड-जालना रोडवरील खड्डे प्रश्नी स्वाभीमान पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. खड्डे बुजविण्याची वारंवार मागणी करूनही झोपेचं सोंग घेणार्‍या जिल्हा प्रशासनाविरोधात शहराजवळील संगम हॉटेलजवळ आज (दि.14) सकाळी 11 वाजता भर रस्त्यात ‘झोपा काढो’ आंदोलन करण्यात येत आहे. या प्रशासनाविरोधातील आंदोलनात वाहनधारक, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन स्वाभीमानचे जिल्हाध्यक्ष प्रा.सचिन उबाळे यांनी केले आहे.echo adrotate_group(6);

पुढे म्हटले आहे की, बीड शहरातून जाणार्‍या मुख्य रस्त्यावर पावलोपावली खड्डे झाले आहेत. त्यामुहे सध्या हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी छोठे-मोठे अपघात होऊन वाहनधारक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शहरातून जाणारा बायपास रस्ता एकदम गुळगळीत आहे, मात्र शहरातून जाणार्‍या रस्त्याची मात्र दुरावस्था झाली आहे. हा रस्ता नावाला शिल्लक राहिलेला नाही, इतके खड्डे झाले आहेत. तरी देखील प्रशासनाकडून झोपेचे सोंग घेतले जात आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याबाबत मंगळवारी निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन खड्डे बुजविण्याची मागणी केली होती. परंतू दखल घेण्यात आली नसल्याने प्रशासनाविरोधात शहराजवळील संगम हॉटेलजवळ आज (दि.14) सकाळी 11 वाजता भर रस्त्यात ‘झोपा काढो’ आंदोलन करण्यात येत आहे. या जिल्हा प्रशासनाविरोधातील आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन स्वाभीमानचे जिल्हाध्यक्ष प्रा.सचिन उबाळे यांनी केले आहे.echo adrotate_group(8); echo adrotate_group(10);echo adrotate_group(9);