बीड

दुचाकी-जीपच्या धडकेत दोघे ठार

By Karyarambh Team

February 15, 2021

केज-अंबाजोगाई रोडवर होळनजीक अपघात होळ : भरधाव वेगातील दुचाकी -जीपच्या धडकेत दोन युवक जागीच ठार झाले. हा अपघात केज -अंबाजोगाई रस्त्यावरील होळजवळ सोमवारी सकाळी साडेदहा वाजता घडला.

अजिंक्य दत्ता धस (वय २०), महेंद्र भीमराव घुगे (वय २०, दोघेही रा.होळ ता.केज) असे मृतांची नावे आहेत. हे दोघे दुचाकीवरून (क्र.एम.एच. ४४ व्ही २१८९) लग्नासाठी अंबाजोगाईकडे जात असताना समोरून भरधाव वेगात आलेल्या जीपला (क्र.एम.एच.२४ व्ही ४४८९) जोराची धडक दिली. यात  अजिंक्य धस यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर महेंद्र घुगे यास रुग्णालयात नेले होते. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मृत घोषित केले. घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते.