क्राईम

उभ्या ट्रॉलीला धडकून दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

By Keshav Kadam

February 22, 2021

एक जखमी, केसापुरी कँम्प जवळील घटनामाजलगाव दि.22 : गेवराई रोडवर केसापुरी कँम्प जवळ उसाने भरलेल्या उभ्या ट्रँलीला दुचाकी धडकुन दुचाकीवरील दोन तरुण ठार तर एक जखमी झाला. ही घटना दि.21 रविवार रोजी रात्री आकराच्या दरम्यान घडली.माजलगावकडुन दुचाकीवरून केसापुरी कँम्पकडे जात असलेल्या दुचाकीची उसाने भरलेल्या उभ्या ट्रँलीला धडक होऊन रविराज रामहरी शेंडगे (वय २०) रा.उमरी तर विवेक भागवत मायकर (वय २१) पिंपळगाव (नाकले) या दोन तरुणांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. तर तिसरा ओंकार काळे हा तरुण जखमी असुन त्यास औरंगाबाद येथे उपचार साठी दाखल केले आहे.