corona

कोरोना अपडेट

गेवराई येथे कोरोनाचा भडका; महानुभव आश्रमात 29 पॉझीटीव्ह

By Karyarambh Team

February 26, 2021

गेवराई, दि. 26 : तालुक्यातील कोल्हेर या ठिकाणी असणार्‍या येवले वस्तीवरिल महानुभव आश्रमात 29 रूग्ण कोरोना पॉझीटिव्ह आले असल्याची माहीती तहसीलदार सचिन खाडे यांनी दिली. सदरचा परिसर कन्टोंनमेंन्ट झोन म्हणून घोषीत करण्यात आला आहे .या ठिकाणी वास्तवात असणार्‍या 60 जणांची अ‍ॅन्टीजन टेस्ट करण्यात आली होती. यापैकी तब्बल 29 जण पॉझीटिव्ह आले आहेत. या ठिकाणी गेवराईचे तहसिलदार सचिन खाडे व तालुका वैधकीय अधीकारी यांनी भेट दिली असून येथे मेळावा आयोजित करण्यात आला होत. याठिकाणी अनेकांनी हजेरी लावली होती. पॉझीटिव्ह रूग्णांना विलीगीकरण कक्षात हलवण्यात आले असून प्रशासनाला देखील हादरा बसला आहे. याठिकाणी जे लोक आले होते त्यांनी स्वत: पुढे येऊन कोरोना चाचणी करूण घ्यावी, असे अवाहन गेवराईचे तहसिलदार सचिन खाडे यांनी केले आहे.