न्यूज ऑफ द डे

भाजपकडून राज्यात गलिच्छ राजकारण

By Shubham Khade

February 28, 2021

echo adrotate_group(3);

मुख्यमंत्र्यांचा भाजपवर पटलवार मुंबई : राज्यात भाजपकडून राज्यात गलिच्छ राजकारण सुरु असल्याचा पलटवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला आहे. राजीनामा घेणं, गुन्हा दाखल करुन मोकळे होणं म्हणजे न्याय देणं नव्हे. या प्रकरणाचा तपास निःपक्षपातीपणाने व्हावा ही भूमिका आमची आहे. जे तपासातून समोर येईल त्यानुसार कारवाई होईल, असं आश्वासनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलंय.echo adrotate_group(6);

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की न्यायाने वागणं ही आमची जबाबदारी आहे. दोषी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हीच या सरकारची भूमिका आहे. मात्र, सध्या गलिच्छ राजकारण सुरु आहे. एखाद्याला आयुष्यातून उठवायचंच आहे म्हणून काम केलं जातंय. आम्ही म्हणतो तसाच तपास झाला पाहिजे असं म्हटलं जातंय. मात्र, तसं होणार नाही. संजय राठोड यांनी स्वतः राजीनामा दिल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. तपास व्यवस्थित होऊ द्या. तुमच्या काळातही हीच तपास यंत्रणा होती. ज्या पोलिसांवर तुम्ही अविश्वास दाखवत आहात. तुमच्या काळातही त्यांनीच तपास केला होता. मग आता अविश्वास कसा दाखवता? पोलीस हा सरकारचा कणा असतो, अशावेळी त्यांच्यावर अविश्वास दाखवणं चुकीचं आहे, असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांचा राजीनामा स्वीकारल्याचं सांगितलं. राजीनामा आल्यानंतर तो फ्रेम करून ठेवायचा नसतो. त्यामुळे तो स्वीकारण्यात आला आहे, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान विरोधी पक्षनेते हे पूर्वी मुख्यमंत्री होते. त्यामुळे गुन्हा कधी दाखल करतात हे त्यांनाही माहीत आहे. आधी तपासाचा प्राथमिक अहवाल येऊ द्या. अहवाल आल्यानंतर त्यात काही असेल तर त्यानुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं. राज्यातील विरोधी पक्ष दुतोंडी कोरोना काळात भ्रष्टाचाराचा आरोप खोटा आहे. धारावी पॅटर्नचं जागतिक पातळीवर कौतूक झालं आहे. सरकारचं सोडा पण तुम्ही कोविड यौद्ध्यांची थट्टा करताय. असा दुतोंडी विरोधी पक्ष महाराष्ट्रानं कधी अनुभवला नाही. इतरही काही आरोप केलेत त्या सर्वाची उत्तरं देणार नाही. सावरकरांची जयंती की पुण्यतिथी हे आधी त्यांनी ठरवावं. कर्नाटकात तुम्ही आहात, खाली वर तुम्ही आहात सीमाप्रश्न का सोडवला नाही, असाही सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे.echo adrotate_group(5); echo adrotate_group(1);echo adrotate_group(9);