अंबाजोगाई

धारदार शस्त्राने भोसकून युवकाची हत्या

By Keshav Kadam

March 01, 2021

अंबाजोगाई दि.1 ः शहरातील पाण्याच्या टाकीजवळ सोमवारी (दि.1) सायंकाळी साडे सातच्या सुमारास मोरेवाडी येथील युवकाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.      गणेश सुंदरराव मोरे असे मयत युवकाचे नाव आहे. दोन मारेकरी तोंडाला रुमाल बांधून आले व त्यांनी धारदार शस्त्राने गणेशवर वार केले. या हल्ल्यात गणेश रक्ताच्या थारोळ्यात पडला. मोरकरी घटनास्थळावरुन पासर झाले असून मृतदेह स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालय दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.