आष्टी

एसीबीची आष्टीत कारवाई

By Keshav Kadam

March 02, 2021

बीड दि.2 ः सोमवारी रात्री लेखा परिक्षण कार्यालयात सहाय्यक संचालक लेखा परिक्षण (वर्ग 1) या अधिकार्‍यास वीस हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईत गुन्हा दाखल होऊन काही तास उलटत नाही तोच एक तलाठ्यास लाच घेताना मंगळवारी (दि.2) दुपारी 1 च्या सुमारास तीन हजाराची लाच मागणार्‍या तलाठ्यावर एसीबीने कारवाई केली आहे.बाळु महादेव बनगे (रा.मुर्शदपूर ता.जि.बीड) असे तलाठ्याचे नाव आहे. मोराळा सज्जाचे ते तलाठी होती. तक्रारदाराकडे शेती वाटणीपत्राद्वारे नावे करण्यासाठी तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.रविंद्र परदेशी व टिमने केली. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.