bharat biotech co vaccine

कोरोना अपडेट

सिरमपेक्षा भारत बायोटेकची लस प्रभावी

By Karyarambh Team

March 04, 2021

echo adrotate_group(3);

भारत बायोटेकने जाहीर केला डाटा

पुणे : सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस 70.42 प्रभावी असल्याचं समोर आलं आहे. तर भारत बायोटेक ही स्वदेशी लस 81 टक्के प्रभावी ठरल्याचा दावा भारत बायोटेकने केला आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन घेण्यास भारतात अनेकांनी विरोध केला होता. परंतु आता या लसीचा डाटा कंपनीने जाहीर केला आहे.आयसीएमआरच्या सहभागातून ही कोवॅक्सिन लस तयार करण्यात आली आहे. भारत बायोटेकने घेतलेल्या चाचणीत 25,800 नागरिकांनी भाग घेतला होता. भारतात लसीच्या चाचणीत भाग घेणार्‍यांची ही सर्वाधिक संख्या आहे.करोनाविरोधी लढाई आणि लसीच्या संशोधनात आजचा दिवस हा मैलाचा दगड ठरला आहे. करोनावरील लसीची तीन टप्प्यात चाचणी केली गेली. ज्याचा डाटा आता समोर आला आहे. लसीच्या पहिल्या, दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यात 27 हाजारांहून अधिक नागरिकांनी भाग घेतला, अशी माहिती भारत बायोटेकचे प्रमुख आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एल्ला यांनी सांगितलं.करोनाविरोधात क्लिनिकल चाचणीत कोवॅक्सिन लस अधिक प्रभावी असल्याचं समोर आलं आहे. एवढचं नव्हे करोनाच्या नव्या संसर्गजन्य स्ट्रेनविरोधातही ही लस प्रभावी ठरली आहे, असं एल्ला यांनी सांगितलं. इंडियन मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया आणि हैदराबादमधील भारत बायोटेकने ही लस संयुक्तपणे तयार केली आहे. भारत सरकारने भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन आणि ऑक्सफोर्डच्या अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या कोविशिल्ड लसींना मंजुरी दिली आहे. कोवॅक्सिन लस तयार करण्यासाठी मृत करोना व्हायरसचा उपयोग केला गेला आहे. जेणे करून नागरिकांना त्यामुळे नुकसान होऊ नये. लसीने शरीरात प्रवेशात केल्यानंतर करोना संसर्गाविरोधात प्रतिकारशक्ती तयार करते.echo adrotate_group(7); echo adrotate_group(10);echo adrotate_group(8);