ghoda

न्यूज ऑफ द डे

घोड्यावाल्या अधिकार्‍याचा माफीनामा

By Karyarambh Team

March 04, 2021

echo adrotate_group(3);

नांदेड : जिल्हाधिकारी कार्यालयात येण्यासाठी मला घोडा आणण्यास व तो कार्यालयात बांधण्यास परवानगी देण्यात याची असा अर्ज नांदेडमधील सहायक लेखाधिकारी (रोहयो) सतीश पंजाबराव देशमुख यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केला होता. मात्र जिल्हाधिकार्‍यांनी त्यांना परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी आपला अर्ज माघारी घेत माफीनामा लिहीला आहे.सतीश देशमुख यांनी लिहीलेले पत्र समाज माध्यमावर तुफान व्हायरल झाले होते. त्याची राज्यभर चर्चा सुरू झाली. देशमुख यांच्या मागणीवर वैद्यकीय अधिष्ठातांचा अभिप्राय मागविण्यात आला होता. अस्थिव्यंग विभागाने पाठीच्या कण्याच्या दुखण्यावर दुचाकीऐवजी घोड्यावर बसून कार्यालयात येणे, हा उपाय संयुक्तिक नसल्याचा अभिप्राय दिला. तो अधिष्ठातांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठवला. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी ही परवानगी नाकारली. देशमुख यांनी 3 मार्च रोजी हे पत्र लिहिलं होतं. कायार्र्लयीन परीसरामध्ये घोडा बांधण्याची परवानगी मिळण्याबद्दल’, असा या पत्राचा विषय आहे. पत्रात म्हटले होते की ‘उपरोक्त विषयी विनंती करण्यात येते की मी सतीश पंजाबराव देशमुख, सहाय्यक लेखाधिकारी (रोहयो शाखा) जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे कार्यरत आहे. मला पाठीच्या कण्याचा त्रास होत असल्यामुळे टू व्हिलरवर येण्यास त्रास होतो. त्यामुळे मी घोडा खरेदी करण्याचे ठरविले आहे. घोड्यावर बसून विहीत वेळेत कार्यालयामध्ये येणे मला शक्य होईल व घोडा आणल्यास त्याला बांधण्यासाठी कार्यालयीन परिसरात परवानगी देण्यात यावी, ही विनंती असा मजकूर या पत्रामध्ये आहे. तसेच या पत्राची एक प्रत रोहयोच्या उपजिल्हाधिकार्‍यांनाही पाठवण्यात आल्याचेही पत्रामध्ये नमूद केलेलं आहे.echo adrotate_group(6); echo adrotate_group(10);echo adrotate_group(8);