sucide, atmhatya

कोरोना अपडेट

कोरोना उपचार केंद्रात डॉक्टरकडून रूग्ण महिलेकडे शरीरसुखाची मागणी

By Karyarambh Team

March 04, 2021

echo adrotate_group(3);

डॉक्टरास बडतर्फ केल्याची उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

औरंगाबाद, दि. 4 : महिला कुठेच सुरक्षीत नाहीत, याचा प्रत्यय औरंगाबादच्या कोरोना उपचार केंद्रात आला. या ठिकाणी एका डॉक्टराने चक्क उपचारासाठी दाखल असलेल्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. एवढंच नाहीतर तिला गच्चीवर ओढत नेऊन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. संबंधीत महिलेने आरडा-ओरड केल्यानंतर आजुबाजुचे रुग्णांनी तिकडे धाव घेतली. त्यानंतर या महिलेची डॉक्टरच्या तावडीतून सुटका झाली. झाल्या प्रकरणाचे पडसाद आज विधानसभेतही उमटले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधीत डॉक्टरला बडतर्फ केल्याची माहिती सभागृहात दिली.पदमपुरा येथील कोरोना उपचार केंद्रात दोन दिवसांपूर्वी एक महिला रुग्ण दाखल झाली. या महिलेचा मोबाईल नंबर घेऊन एक आयुष डॉक्टर तिला सतत फोन करीत होता. मंगळवारी रात्री दोन वाजता डॉक्टरने या महिलेकडून शरीर सुखाची मागणी केली. तिला गच्चीवर नेण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्याला विरोध करत आरडाओरड केली. त्यामुळे कोविड केअर सेंटरमध्ये एकच गोंधळ उडाला. इतर कर्मचार्‍यांनी धाव घेऊन मध्यस्थी केली. पीडित महिला रुग्णालयात रडत होती. घटनेची माहिती नातेवाईकांना मिळाली. नातेवाईकांनी रुग्णालयात शिरून त्या डॉक्टरला बेदम मारहाण केली. बुधवारी झालेला प्रकार प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांना कळला. त्यांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी करून अहवाल गुरुवारी सकाळपर्यंत चौकशी करून अहवाल सादर करावा, असे आदेश दिले. विशेष म्हणजे या प्रकाराबाबत पोलिसात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. महानगरपालिकेकडून डॉक्टरची हकालपट्टी केल्याची माहिती औरंगाबाद महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी नीता पाडळकर यांनी दिली आहे सदरील घटनेची तपासणी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे देखील पाडळकर म्हणाल्या मात्र सदरील प्रकरणी महिलेने कुठलीही तक्रार दिलेली नाही त्यामुळे कायदेशीर कारवाई होऊ शकली नाहीecho adrotate_group(7); echo adrotate_group(10);echo adrotate_group(8);