Site icon कार्यारंभ लाईव्ह

गळफास घेऊन 16 वर्षीय मुलीची आत्महत्या

corona pecaint suicide

बीड दि.4 : घरातील छताच्या पंख्याला गळफास घेऊन एक 16 वर्षीय मुलीने आत्महत्या केली. ही घटना शहरातील बजरंगनगर येथे गुरुवारी (दि.4) सकाळी उघडकीस आली.
पौर्णिमा सतीश निर्मळ (वय 16 रा. बजरंग नगर ता.जि बीड) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. तिने बजरंग नगर येथे राहत असलेल्या घरामध्ये छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने खळबळ उडाली असून घटनास्थळी शिवाजीनगर पोलीसानी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Exit mobile version