क्राईम

बनावट दारू विक्री करणारी टोळी पकडली

By Keshav Kadam

March 05, 2021

echo adrotate_group(3);

 echo adrotate_group(7);

पैठण दि. 5 : बनावट दारू तस्करी करून पैठण परिसरात विक्री करणाऱ्या टोळीचा दारुबंदी विभागाने पर्दाफाश केला आहे. १८० मिलीच्या १ हजार १५२ सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. सदरील आरोपींना पाचेगाव येथून अटक केली आहे. पैठण तालुक्यातील विविध ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून बनावट दारूची विक्री केली जात आहे. याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरक्षक शरद फटांगडे यांना मिळाल्यामुळे त्यांनी तात्काळ विशेष पथक तयार करून बिडकीन परिसरात सापळा रचून औरंगाबाद पैठण रोडवरील बिडकीन जवळ कारवाई केली. एका पिकअपमध्ये (एमएच १७ के ९७६२) या वाहनाला थांबवून झडती घेतली. कोणालाही संशय येऊ नाही म्हणून वाहनांमध्ये भंगार सामानाच्या खाली १८० मिलिमीटरच्या विविध बॅच असलेल्या १ हजार १५२ बनावट दारूच्या बाटल्या अंदाजे किंमत ३ लाख ९४ हजार २२० रुपयाच्या आहेत. या प्रकरणी आरोपी धम्मा भीमा वक्ते व गणेश अच्युराव लहाने (रा.पाचेगाव ता गेवराई जि. बीड) या दोघांना ताब्यात घेतले आहे. सदरील दारुच्या बॉटलवर गोव्या राज्यामध्ये विक्रीचा परवाना असून या तस्करीमधील प्रमुखसूत्रधार गेवराई येथील रामेश्वर बळीराम हातोटे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे दारूबंदी विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी बीड येथील दारूबंदी अधीक्षक नितीन धार्मिक यांना सूचना देऊन सदरील सराईत दारू तस्करी करणाऱ्या आरोपीच्या घराची झडती घेत गेवराई पोलिसांच्या मदतीने हातोटे याला अटक केली. तसेच अन्य तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. सदरील कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, अधीक्षक सुधाकर कदम, निरक्षक शरद फटांगडे, दुय्याम निरिक्षक आगळे, रोटे, जवान विजय मकरंद, अमोल अन्नदाते, राजू अंभोरे, हर्षल बारी, नवनाथ घुगे यांनी केली आहे.echo adrotate_group(5);

echo adrotate_group(9); echo adrotate_group(10);