बीड

12 विद्यार्थी पॉझिटिव्ह; नवोदय विद्यालयास जिल्हाधिकार्‍यांची भेट

By Karyarambh Team

March 06, 2021

echo adrotate_group(3);

बीड : गेवराई तालुक्यातील गढी येथे असलेल्या नवोदय विद्यालयातील 12 विद्यार्थी कोरोना बाधित आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने दखल घेत तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत . नवोदय निवासी विद्यालयास जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी तातडीने भेट दिली यावेळी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची पाहणी करून त्यांनी संबंधित यंत्रणांना तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले.echo adrotate_group(6);

नवोदय विद्यालयात 102 विद्यार्थी निवासी पद्धतीने शिक्षण घेत असून त्यासह 27 कर्मचारी देखील आहेत येथे असणार्‍या विद्यार्थ्यांसह अध्यापक, कुटुंबीय आणि कर्मचारी यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले असून त्यामध्ये प्राचार्य आणि अध्यापक या दोघांसह कुटुंबातील दोन सदस्य, एक आचारी व एक मेस कर्मचारीदेखील कोरोना बाधित आढळून आले आहेत. एकाच वेळी अनेक जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आल्याने जिल्हाधिकारी श्री. जगताप यांनी येथील नवोदय विद्यालयातील सर्व विद्यार्थी अध्यापक कर्मचारी आदींच्या कोरोना तपासणीसाठी आर.टी.पी.सी.आर. चाचण्या करण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोना बाधित विद्यार्थ्यांना स्वतंत्ररित्या विद्यार्थी वसतीगृहात क्वारंटाईन ठेवण्यात आले असून अध्यापक-कर्मचारी यांना नवोदय विद्यालय परिसरातील त्यांच्या निवासस्थानी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. यासह येथे करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची देखील जिल्हाधिकारी जगताप यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, गेवराई तहसीलदार सचिन खाडे, गेवराई तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कदम यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.echo adrotate_group(8); echo adrotate_group(1);echo adrotate_group(9);