corona virus

कोरोना अपडेट

बीड जिल्हा : आज 89 कोरोना पॉझिटिव्ह

By Karyarambh Team

March 08, 2021

बीड : जिल्ह्यात सोमवारी 89 कोरोना रूग्णांची भर पडली आहे. रूग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊनची टांगती तलवार आता जिल्ह्यावर आहे.

प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार, 855 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 89 अहवाल पॉझिटिव्ह तर 766 अहवाल निगेटिव्ह आहेत. यात बीड तालुक्यात सर्वाधिक 40 तर अंबाजोगाई, आष्टी प्रत्येकी 11, गेवराई 5, केज 3, माजलगाव 9, परळी 7, शिरूर प्रत्येकी 3 असे एकूण 89 पॉझिटिव्ह आले आहेत.