लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून!

क्राईम न्यूज ऑफ द डे माजलगाव

माजलगाव दि.8 : तालुक्यातील पात्रुड येथे अनेक दिवसापासून जागेच्या किरायावरून दोन भावांमध्ये वाद होत होता. त्या वादाचे रूपांतर सोमवार (दि.8) रोजी मोठ्या भांडणात झाले. लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची घटना घडली आहे. आरोपी स्व:त पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.
माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे प्लॉटच्या किरायाचा वादावरून दोन भावामध्ये अनेक दिवसापासून वाद सुरु होता. सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोघामध्ये वाद झाला. दोघा भावांच्या हातात धारदार शस्त्र असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या भांडणात शेख हर्षद शेख शकील या छोट्या भावाने शेख इर्शाद शेख शकील याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत खून केला. आरोपी हा स्वतः माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात हजार झाला आहे. या वादात आई एकाच्या बाजूने तर वडील एकाच्या बाजूने असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनास्थळी ग्रामीण पोलीस तात्काळ हजर झाले. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश पाटील यांनी भेट दिली. या संदर्भात मयताच्या पत्नीच्या फिर्यादीवरुन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Tagged