corona pecaint suicide

तेरा वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड


धारूर दि.9 : तालुक्यातील अंजनडोह येथे एका 13 वर्षीय चिमुकलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि.8) रात्री उघडकीस आली.
रेणुका शंकर रेपे (वय 13 रा.अंजडोहा ता.धारूर जि. बीड) असे मुलीचे नाव आहे. धारूर तालुक्यात आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. पंधरा दिवसांपूर्वी अंजनडोह येथील वयोवृद्ध नागरिक बालासाहेब सोळंके यांनी गावातील हनुमान मंदिरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना याच गावातील 13 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्यापपर्यंत समजू शकले नाही. दोन दिवसापूर्वी तालुक्यातील भोपा येथे 24 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली होती तालुक्यातील आत्महत्यांचं सत्र काही केल्या थांबत नसल्याचे चित्र आहे.

Tagged