crime

किराणा दुकानातून जप्त केला 41 हजारांचा गुटखा

केज न्यूज ऑफ द डे बीड

केज दि.9 :  किराणा दुकानात लपवून ठेवलेला 41 हजार रुपयांचा गुटखा अन्न व भेसळ सुरक्षा अधिकार्‍यांनी सोमवारी (दि.8) जप्त केला. या प्रकरणी शिवरुद्र रामभाऊ चोपणे यांच्या विरोधात युसूफवडगाव पोलीसात गुन्हा नोंद झाला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद झोटे करत आहेत.
बीड येथील अन्न भेसळ, सुरक्षा अधिकारी ऋषीकेश मारेवार यांनी 8 मार्च रोजी संध्याकाळी 8 वाजण्याच्या सुमारास युसुफवडगांव येथील बसस्थानकाजवळ असलेल्या शिवरुद्र चोपणे यांच्या किराणा दुकानात धाड टाकली. यावेळी दुकानात लपवून ठेवलेला राजनिवास सुगंधी पान मसाला, जाफराणी जर्दा पुडे, एक नंबर गुटखा असा 41 हजार 100 रुपयांचा माल जप्त केला. या प्रकरणी ऋषीकेश रमेश मारेवार यांच्या फिर्यादीवरून शिवरुद्र रामभाऊ चोपणेवर अन्न सुरक्षा अधिनियम कलम 26, (2), 30, 59, व कलम 204, 188, 272, 273, 328 भा.दं.वि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि.आंनद झोटे करत आहेत.

Tagged