क्राईम

विष प्राशन करुन इसमाची आत्महत्या

By Karyarambh Team

March 09, 2021

पैठण एमआयडीसीतील घटना पैठण दि.9 : पैठण तालुक्यातील आखदवाडा येथील एका 45 वर्षीय व्यक्तीने एमआयडीसी परिसरातील भीमाशंकर महाविद्यालयाजवळ विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पैठण तालुक्यातील आखदवाडा येथील बद्री आसाराम मस्के (वय 45 ह.मु गणेशनगर एमआयडीसी) यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली. याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे मसपोनि.अर्चना पाटील यांनी तत्काळ घटनास्थळ जाऊन पाहणी केली. पंचनामा करून सदरील व्यक्तीने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणी पोलीसात नोंद करण्यात आली असून पुढील तपास जमादार दिनेश दाभाडे करत आहेत.