कोरोना अपडेट

आता कैद्यांशी व्हिडिओ कॉल, ई-मेलद्वारे साधता येणार संवाद

By Shubham Khade

March 09, 2021

echo adrotate_group(3);

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांचा मोठा निर्णयecho adrotate_group(7); बीड : कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी कारागृहातील कैद्यांशी प्रत्यक्ष भेटीस मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांचे नातेवाईक, वकील भेटीऐवजी व्हिडिओ कॉल व डेडीकेटेड ई-मेलव्दारे संवाद साधू शकतात. तशा सुविधा उपलब्ध करून देण्यासह कैद्यांशी प्रत्यक्ष भेटी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिले आहेत.echo adrotate_group(8);

येथील जिल्हा कारागृह वर्ग-2 यांनी कारागृहातील कैद्यांना कोरोना या रोगाचा प्रादुभाव टाळण्यासाठी बंद्यांचे समक्ष नातेवाईक, वकील भेटीऐवजी व्हिडिओ कॉल, डेडीकेटेट ई-मेलव्दारे वकीलाशी संपर्क यासारख्या सुविधा पुर्ववत करण्यासंदर्भात उचित निर्णय घ्यावा अशी विनंती केली होती. त्याअनुषंगाने हे आदेश देण्यात आले आहेत, असे जिल्हा दंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा अपती व्यवस्थापन प्राधिकरणकडून कळविण्यात आले आहे.echo adrotate_group(9); echo adrotate_group(10);