क्राईम

शेतात लागलेली आग विझवण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍याचा करंट बसून मृत्यू

By Keshav Kadam

March 09, 2021

पैठण दि.9 : शेतातील गव्हाच्या पीकाला लागलेली आग विझवण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍याचा करंट बसून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.9) दुपारी पैठण तालुक्यातील ईसारवाडी परिसरात घडली. पैठण तालुक्यातील ईसारवाडी परिसरात मंगळवारी दुपारी संतोष कडुबाळ चाबुकस्वार (वय 30 रा.पिंपळवाडी) या तरुण शेतकर्‍यांच्या शेतात गव्हाच्या पिकाला अचानक आग लागली. ही आग विझवण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत असताना शेतामध्ये महावितरण कंपनीचे तुटलेली तार पडलेली होती. घाईगडबडीत या तारेला स्पर्श झाल्यामुळे वीजेचा शॉक बसला. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या मसपोनि.अर्चना पाटील यांनी घटनास्थळी जाऊन सदरील शेतकर्‍याला पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले. या घटनेची अकस्मात नोंद करण्यात आली असून पुढील तपास बीट जमादार एस.पवार, दाभाडे हे करत आहेत.