क्राईम

परिवर्तनचे आणखी दोन आरोपी गजाआड

By Keshav Kadam

March 10, 2021

माजलगाव दि.9 : येथील ‘परिवर्तन’ मल्टीस्टेच्या माध्यमातून ठेवीदारांना कोट्यावधींचा गंडा घालणारा मुख्य आरोपी विजय आलझेंडे हा मंगळवारी (दि.9) माजलगावच्या न्यायालयासमोर शरण आला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी (दि.10) आणखी दोघांना गजाआड केले आहे. संजय बाबूलाल शर्मा (वय 52 रा.माजलगाव) व बालाजी मधुकरराव पानपट (वय -39 रा.माजलगाव) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. संजय शर्मा यावर आष्टी पोलीस ठाण्यात कलम 420 प्रमाणे एकुण 11 गुन्हे दाखल आहेत. तर बालाजी पानपट यावर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात 420 प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदरील गुन्ह्यात हे आरोपी फरार होते. बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना गजाआड केले आहे. त्यांना अर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख सपोनि.सुजित बडे करत आहेत. कालच या प्रकरणातील मुख्य आरोपी विजय उर्फ भारत आलझेंडे हा न्यायालयात शरण आला होता. यातील एक एक आरोपी पोलीसांच्या जाळ्यात अडकत असल्याचे दिसत आहे.