अंबाजोगाई

अंबाजोगाईत पुन्हा एक खून!

By Keshav Kadam

March 11, 2021

अंबाजोगाई : शहरातील मंगळवार पेठ भागात गुरुवारी (दि.११) पहाटे एका तरूणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. डोक्यावर कुठल्यातरी वस्तूने प्रहार करून हा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आठ दिवसातील खुनाच्या दुसऱ्या घटनेने शहर हादरले आहे.

नितीन उर्फ बबलू साठे (वय ३८) असे त्या मृत तरूणाचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार शहरातील मंगळवार पेठ भागात गुरीवरी पहाटे १२.३० वाजताचा सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून त्याचा काही व्यक्तींसोबत वाद झाला. या वादातून झालेल्या मारहाणीत डोक्याला गंभीर इजा होऊन नितीनचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.