क्राईम

एसआर जिनिंगजवळ मृतदेह आढळला

By Keshav Kadam

March 14, 2021

बीड दि.14 : ग्रेसच्या नालीमध्ये एका 30 वर्षीय तरुणाचा रविवारी (दि.14) मृतदेह आढळून आला. घटनास्थळी बीड ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली असून पुढील तपास करत आहेत. रवी अंशीराम येवले (वय 30 रा.गोंदी ता.गेवराई ह.मु. घोसापुरी) असे मायताचे नाव आहे. धुळे-सोलापूर महामार्गावरील नामलगाव फाटा येथील एसआर जिनिगसमोर रोडच्याकडेला टाकलेल्या ग्रीसमध्ये मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोनि. संतोष साबळे, पोउपनि.रोठे, सपोउपनि. मांडवे, जमादार तुळशीराम जरे, बाळकृष्ण म्हेत्रे, रेवन दुधाने व स्थानिक गुन्हे शाखेची टीमने आदींनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.