टेस्ट वाढताच कोरोनाचा आकडा वाढला

कोरोना अपडेट

बीड जिल्ह्यात आज 260 कोरोना रूग्ण
बीड : जिल्ह्यात बुधवारी तब्बल 260 कोरोना रूग्णांची भर पडली आहे. टेस्टचा आकडा वाढताच हा परिणाम दिसून आला आहे. नागरिकांनी आता अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.
जिल्हा प्रशासनाला दुपारी प्राप्त अहवालानुसार, 2 हजार 641 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 260 अहवाल पॉझिटिव्ह तर 2381 अहवाल निगेटिव्ह आहेत. यात बीड तालुक्यात सर्वाधिक 123 तर अंबाजोगाई 52, आष्टी 15, धारूर 2, गेवराई 9, केज 15, माजलगाव 19, परळी 13, पाटोदा 5, शिरूर 5, वडवणी 2 असे एकूण 260 पॉझिटिव्ह आले आहेत.

Tagged