क्राईम

पोलीस ठाण्यातच पोलीस कर्मचार्‍यास मारहाण करत जीवे मारण्याची धमकी

By Keshav Kadam

March 15, 2021

बीड दि.15 : पेट्रोल पंपावर गोंधळ करणार्‍या दोघांना पोलीसांनी ठाण्यात आणले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर यातील सरपंच पुत्राने शिवीजीनगर ठाण्याच्या कर्मचार्‍यास धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. या प्रकरणी दोघांवर बीड शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. संदीपान दत्तोबा बडगे (रा. बेलखंडी पाटोदा) व अभिषेक असाराम पवळ (रा. संभाजीनगर, बीड) हे दोघे रविवारी चर्‍हाटा फाट्यावर असलेल्या उबाळे यांच्या पेट्रोल पंपावर स्कॉर्पिओ (एम.एच. 23 ए.एक्स. 5939) यामध्ये आले होते. डिझेल भरल्यानंतर तेथी कर्मचारी आकाश शिंदे यांनी पैसे मागितले. पैसे का मागितले म्हणून आकाश शिंदे यास मारहाण केली. त्यामध्ये मध्यस्थी करण्यास गेलेले मॅनेजर अमोल कदम यांनाही शिवीगाळ करून मारहाण केली. घटनेची माहिती शिवीजीनगर ठाण्याच्या पोलिसांना झाल्यानंतर ठाण्याचे जालिंदर नाना बनसोडे व अन्य कर्मचारी त्याठिकाणी गेले. तेथे गेल्यानंतर शिंदे व कदम यांना ठाण्यात आणले. त्यानंतर संदीपान बडगे आणि अभिषेक पवळ हे दोघे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आले, त्यांनी बनसोडे यांचे गचुरे धरत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. ठाण्यातच बडगे यांनी बनसोडे यांना शिव्या दिल्या. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी बनसोडे यांच्या फिर्यादीवरून संदीपान बडगे व अभिषेक पवळ या दोघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम 353, 332, 534, 506, 34 अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 3 (1 आर), 3 (1 एस) 3 (2 व्ही.ए.) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. संदीपान बडगे यांची आई बेलखंडी पाटोद्याची सरपंच आहे.