बीड दि.15 : शहरातील नाळवंडी रोडवरील आदित्य कॉलेजच्या इमारतीत स्थलांतरीत झालेल्या जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीवरुन रविवारी रात्री उडी मारली. त्यानंतर उपचारादरम्यान सोमवारी (दि.15) सकाळी मृत्यू झाला.
अबोल अशोक भोसले (वय 31, रा. सावरगाव ता. भूम ,जि. उस्मानाबाद) असे मयताचे नाव आहे. घोडनदी शिरूर (पुणे) येथे अबोल भोसले या तरुणाने गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सदरील घटनेत त्याच्या गळ्याला जखम झाल्याने प्राथमिक उपचारानंतर बीड येथील आदित्य कॉलेजमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दि.11 मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना अबोल भोसले याने रुग्णालयाच्या तिसर्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी पोनि.विश्वास पाटील, एएसआय पवार यांनी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मूळ जिल्हा रुग्णालयात पाठवला. सदरील घटनेने खळबळ उडाली.