क्राईम

अवैध वाळू वाहतूक करणारे दोन टिप्पर पकडले

By Keshav Kadam

March 17, 2021

बीड दि.17 : अवैध वाळू वाहतूक करणार्‍या हायवा टिप्परवर बुधवारी पहाटे कारवाई करण्यात आली. या प्रकरणी दोन टिप्पर चालकासह दोन मालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने केली. अवैध वाळू उपसा व वाहतूक कितीही कारवाया केल्यातरी कमी होताना दिसत नाही. बुधवारी पहाटे पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख सपोनि.विलास हजारे यांनी गेवराई तालुक्यातील उमापूर फाटा येथे अवैधरित्या वाळू घेऊन जात असलेल्या (एमएच-14 डीएम-9788) व (एमएच-15 एफ-6131) या दोन टिप्परवर कारवाई केली. या प्रकरणी दोन चालक व दोन मालक असे चौघांवर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.