महाराष्ट्र

करुणा धनंजय मुंडे निवडणुकीचं मैदान गाजवणार

By Karyarambh Team

March 18, 2021

echo adrotate_group(3);

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी नातं मान्य केलेल्या करुणा शर्मा आता राजकारणात पाऊल टाकणार आहेत. तशी माहिती स्वत: करुणा शर्मा यांनी दिली आहे. करुणा यांनी आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली. आपण पी उत्तर विभागातील प्रश्न घेऊन आलो आहोत. स्वच्छतागृह आणि करचा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महापौरांची भेट घेतल्याचं करुणा यांनी सांगितलं.धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर करुणा शर्मा या चर्चेत आल्या होत्या. रेणू शर्मा यांनी आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पुढे येत करुणा शर्मा यांच्याबद्दल स्वत:च माहिती दिली होती. जवळपास आठवडाभर हे प्रकरण चांगलंच तापलं होतं. पण रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतल्यानंतर हे प्रकरण शमलं. मात्र या संपूर्ण प्रकरणानंतर आता करुणा शर्मा यांनी सामाजिक कार्याकडे आपली वाटचाल सुरु केली आहे. करुणा या आधीपासून अनेक सामाजिक कामात पाहायला मिळाल्या होत्या.echo adrotate_group(7);

‘आमदारकीची निवडणूकही लढवणार’आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतल्यानंतर करुणा शर्मा यांनी आपण समाजसेविका आहोत. पुढे राजकारणातही येईल, असं सांगितलं. इतकंच नाही तर आपल्याला आमदारकीची निवडणूक लढवायची असल्याचं करुणा यांनी स्पष्ट केलं. महापौरांची भेट घेऊन करुणा यांनी स्वच्छतागृह आणि कचर्‍याचा प्रश्न मांडल्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडेही एक तक्रार केली आहे. सोशल मीडियावर खलिफा डॉट कॉमसारख्या अ‍ॅप्लिकेशन्सवर फेसबुक आणि इतर समाजमाध्यमांवर अश्लील व्हिडीओ येत असतात, त्याविरोधात कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.echo adrotate_group(5);

‘वेळ येईल तेव्हा सगळ्या गोष्टी पुराव्यासह मांडणार’echo adrotate_group(9);

गेली 25 वर्षे आपण घराबाहेर पडलो नाही. पण गेल्या 2 महिन्यांपासून घराबाहेर पडून बोलायला सुरुवात केली आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या घडामोडींविषयी केस असल्यानं कोर्टानं मला बोलण्यास मनाई केली आहे. मात्र, जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळ्या गोष्टी पुराव्यासह मांडेन, असा दावाही करुणा यांनी केला आहे. पूजा चव्हाण असो की इतर कोणतीही मुलगी, तिला न्याय मिळायलाच हवा. माझ्यासोबत जे काही झालं त्यानंतर मीही आत्महत्येचा विचार केला होता. पण मरण्यापेक्षा आपण लढणं पसंत केल्याचं करुणा शर्मा म्हणाल्या. इथून पुढे आपण महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. echo adrotate_group(10);