gelatin

क्राईम

विहीर खोदताना जिलेटीनचा स्फोट दोघांची प्रकृती चिंताजनक

By Karyarambh Team

March 20, 2021

echo adrotate_group(3);

धारूर, दि. 20 : तालुक्यातील धुनकवड येथे शेतातील विहीरीचे खोदकाम सुरू असताना सकाळी आठच्या सुमारास जिलेटिन कांड्याचा स्फोट करण्यात आला. या स्फोटाचा अंदाज न आल्याने येथे काम करण्यास उपस्थित असणार्‍यां पैकी चौघा जणांना दगड उडून मार लागला आहे. पैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. नंतर वैद्यकिय अधिकारी डॉ. चेतन आदमाने तसेच डॉ. परवेझ शेख यांनी तपासणी करत रुग्णांना पुढील उपचारासाठी लातूर येथे पाठवले आहे.echo adrotate_group(7);

तालुक्यात उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेक ठिकाणी शेतकरी शेतात विहिरीचे काम सुरू करतात. यावेळी विहीर खोदताना लागलेला खडक फोडण्यासाठी जिलटीनचा वापर केला जातो. अशाच प्रकारे धुनकवाड येथे विहिरीचे काम सुरू असताना शनिवारी सकाळी सात ते आठच्या सुमारास या कांड्यांचा स्फोट करत असताना त्याचा नेमका अंदाज न आल्याने कामावर उपस्थित असणार्‍या पैकी 4 जणांना स्फोटातील उडालेले दगड लागून जबर मार लागला आहे. जखमीत जमीन मालक भागवत विष्णू यादव (25) रा.धुनकवाड यांच्यासह नागनाथ बालासाहेब तोंडे (27), आशोक लक्ष्मण तोंडे (20), बाबुराव राजेभाऊ तोंडे (25) यांचा समावेश आहे. पोटामध्ये मार लागल्यानंतर सर्वांना धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी रुग्णांची तपासणी वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन आदमाने तसेच डॉ. परवेज शेख यांनी केली. पुढील उपचारासाठी त्यांना लातूरला पाठविण्यात आले आहे. चौघांपैकी दोघांना जबर मार लागल्याने प्रकृती चिंताजनक आहे.echo adrotate_group(5);

जखमींवर उपचार करताना डॉक्ट

echo adrotate_group(1);echo adrotate_group(9);