मेडिकलमध्ये स्फोट होऊन डॉक्टरचा मृत्यू

क्राईम गेवराई

गेवराई: मेडिकलमध्ये अचानक स्फोट होऊन डॉक्टरचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. घटना सोमवारी (दि.8) सकाळी घडली. स्फोट कशामुळे झाला हे मात्र समजू शकले नाही. सुधाकर भाऊसाहेब चोरमले असे डॉक्टरचे नाव आहे. त्यांचा गेवराई शहरात श्री साई समर्थ हा दवाखाना आहे. या दवाखान्याच्या शेजारीच मेडिकल असून या मेडिकलमध्ये अचानक स्फोट झाला. यामध्ये डॉक्टर गंभीररीत्या भाजले गेले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर जखमी सुनील माळी यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. घटनास्थळी गेवराई पोलिसांनी धाव घेतली असून पुढील तपास सुरु आहे.

Tagged