न्यूज ऑफ द डे

लॉकडाऊन काळात तहसीलचे पथक देणार ‘प्रवास परवाना’

By Shubham Khade

March 24, 2021

पाससाठी संपर्क क्रमांक, ई-मेल जाणून घ्या

बीड : लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना प्रवास परवाना घेणे बंधनकारक असणार आहे. यासाठी तालुकास्तरावर तहसीलदारांची पथके काम पाहणार आहेत. या पथकांमार्फत अर्जदारास प्रवास परवाना दिला जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

  अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींनी ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक असणार आहे. याव्यतिरीक्त अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणार्‍या व्यक्तींना ओळखपत्र दिले जाणार आहे. तसेच, केवळ अत्यावश्यक कारणासाठी (जसे की, परीक्षा, दवाखाना) परजिल्ह्यासह जिल्ह्यांतर्गत प्रवास करणार्‍या व्यक्तींना प्रवास परवाना घ्यावा लागणार आहे. त्यासाठी अर्जदाराने विहीत नमुन्यातील अर्ज भरून त्यांचा फोटो व्हॉट्स क्रमांक अथवा ई-मेलद्वारे पाठवावा लागणार आहे. त्यानंतर परवाना मिळणार आहे, असे नियोजन असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविले आहे. तसेच, परजिल्ह्यातून बीड जिल्ह्यात प्रवेश करणार्‍या व्यक्तींना कोरोना चाचणी बंधनकारक असणार आहे.

यांच्याशी साधा संपर्क 1
प्रवास परवाना अर्ज 2
प्रवास परवाना अर्ज 3