धारूर

लॉकडाऊन घोषित होताच साठेबाजी सुरु

By Karyarambh Team

March 25, 2021

echo adrotate_group(3);

दारू, गुटखा, तंबाखुचे भाव वाढले धारूर : जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित करताच अन्नपदार्थ, तंबाखुजन्य पदार्थांसह इंधनाची साठेबाजी केली जात असल्याचे प्रकार धारूर तालुक्यासह जिल्ह्यात समोर येऊ लागले आहेत. प्रामुख्याने अन्नपदार्थांसह तंबाखूजन्य पदार्थ, इंधनाची साठेबाजी होऊ लागली आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात चढ्या दराने विक्री होण्याची शक्यता आहे.echo adrotate_group(7);

जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दोन दिवसांपूर्वी 26 मार्च ते 4 एप्रील अशा 10 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा केली. घोषणा होताच काही तासांनी साठेबाजी करणारे सक्रीय झाल्याचे दिसून आले. देशी-विदेशी दारू, तंबाखूजन्य पदार्थ, विविध प्रकारचा गुटख्याचा साठा करण्यात आला आहे. धारूर शहरात असणार्‍या पेट्रोल पंपावर नियमबाह्य पद्धतीने मागील दोन दिवसात पेट्रोल, डिझेलच्या टाक्या भरून ठेवण्यात आल्या आहेत. याची सत्यता तपासण्यासाठी पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही तपासणी करणे गरजेचे आहे. तसेच, तंबाखूजन्य पदार्थ चढ्या दराने विक्री करण्यास सुरुवात झालेली आहे. शहरातील काही दारू दुकानांमधून मागील दोन दिवसात दारूची झालेली विक्रीही नियमित विक्रीपेक्षा अधिक दराने विक्री आहे. लॉक डाऊन च्या दरम्यान ग्रामीण भागात प्रत्येक किराणा दुकानात खाद्यतेला पेक्षा पेट्रोल जास्त विक्री केलं जात असल्याने शासनाने घालून दिलेले निर्बंध हे केवळ कागदावरच राहणार आहेत. या निर्बंधामुळे सर्वसामान्यांना मात्र आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.echo adrotate_group(8); echo adrotate_group(1);echo adrotate_group(9);