अंबाजोगाई

अंबाजोगाईत मुख्याधिकार्‍यांच्या दालनासमोर नगरसेवकांचा ठिय्या

By Karyarambh Team

March 25, 2021

मालमत्ता, पाणीपट्टी करावरील विलंबशुल्क माफ कराअंबाजोगाई : मालमत्ताकर व पाणी पट्टीकर यावर लागणारा अधिकचा विलंबशुल्क माफ करा, कोरोना रुग्णांची वाढीती संख्या पाहता शहरात तात्काळ सॅनीटायझर फवारणी सुरु करा या मागणीसाठी नगरसेवकांनी येथील नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांच्या दालनासमोर ठिय्या केला आहे.

 नगरसेवक सारंग पुजारी, शेख रहीम, शेख खलील, शेख ताहेर, बालासाहेब पाथरकर यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांचे नगरपालिकेमुळे आणखी हाल होण्याची शक्यता आहे. मालमत्ता कर व पाणी पट्टी कर यावर लागणारा अधिकचा विलंबशुल्क वसुल केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होऊ नयेत म्हणून मुख्याधिकारी यांना मालमत्ता कर व पाणी पट्टीकर यावर लागणारा विलंबशुल्क 24 टक्के व्याज दर माफ करण्यात यावे यामागणीचे निवेदन देण्यात आले. परंतू, दखल घेण्यात आली नाही. तसेच, कोरोना काळात प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यात प्रशासन कमी पडत आहे. त्यामुळे ठिय्या केला जात आहे.