corona-swab

कोरोना अपडेट

बीड जिल्हा : आजही कोरोना तीनशेपार

By Shubham Khade

March 25, 2021

बीड : जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या आजही (दि.25) तीनशेपार आहे. रूग्णसंख्या वाढत आहे, त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तरी देखील नागरिकांकडून नियमांचे पालन होताना दिसून येत नाही.

जिल्हा प्रशासनाला प्राप्त अहवालानुसार, जिल्ह्यातील 2 हजार 276 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 335 अहवाल पॉझिटिव्ह तर 1 हजार 941 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात बीड तालुक्यात सर्वाधिक 106, अंबाजोगाई 90, आष्टी 25, धारूर 5, गेवराई 23, केज 16, माजलगाव 19, परळी 31, पाटोदा 11, शिरूर 4, वडवणी 5 असे रूण आढळून आले आहेत.