क्राईम

बीडच्या बीएससी अ‍ॅग्री महाविद्यालयातील विद्यार्थीनीचा पाचोडमध्ये मृतदेह आढळला

By Keshav Kadam

March 26, 2021

  पैठण दि.26 : बीड येथील बीएससी अ‍ॅग्री महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणार्‍या 21 वर्षीय विद्यार्थिनीचा पैठण तालुक्यातील पाचोड खुर्द येथील विहीरीत मृतदेह आढळून आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा शिवाजी वाघ (वय 21 रा.पाचोड खुर्द ता.पैठण) हीचा ग्रामपंचायतच्या विहिरीमध्ये शुक्रवारी (दि.26) सकाळी मृतदेह आढळून आला. मनिषा ही बीड येथील बीएससी अ‍ॅग्री महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होती. लॉकडाऊन पडल्यामुळे दोन दिवसापूर्वी मनिषा गावी आली होती. पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास करत आहेत. पाचोड खुर्द या गावातील बीएससी पर्यंतचे शिक्षण पुर्ण करणारी गरीब कुटूंबातील मनिषा पहिली विद्यार्थीनी होती. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.