corona

कोरोना अपडेट

कोरोना रुग्णांची संख्या घटली; बीड जिल्हावासियांना थोडाफार दिलासा

By Karyarambh Team

March 28, 2021

बीड, दि.28 : बीड जिल्ह्यात दररोज कोरोनाचा आकडा वाढतच आहे. आज मात्र जिल्हावासियांना थोडाफार दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. प्रशासनाने आज जाहीर केलेल्या 284 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येते. मागील पाच दिवस हा आकडा पावणेचारशेच्या आसपास होता. जिल्ह्यात 26 मार्चपासून पूर्णतः लॉकडाऊन आहे. अगदी किराणा दुकानदारांनी देखील लॉकडाऊनचा निषेध म्हणून 100 टक्के बंद ठेवला आहे. कदाचित सगळं बंद असल्याचा परिणाम म्हणून आजचा आकडा कमी आल्याचे दिसते. आणखी चार ते पाच दिवसात आकडा किती कमी-जास्त होतो त्यानंतर लॉकडाऊन्चा किती परिणाम झाला हे खर्‍या अर्थाने समजून येईल.आज आढळलेले तालुकानिहाय रुग्ण पुढील प्रमाणे…

1
2
3
4
5
6
7
8