CORONA

कोरोना अपडेट

कोरोनाचे पुन्हा त्रिशतक

By Karyarambh Team

March 31, 2021

बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आज (दि.31) कोरोनाचे पुन्हा त्रिशतक झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याची गरज आहे.

  मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या माहितीनुसार, जिल्हा प्रशासनाला बुधवारी 2 हजार 231 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 325 अहवाल पॉझिटिव्ह तर 1 हजार 906 इतके अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात सर्वाधिक बीड तालुक्यात 98, अंबाजोगाई 50, परळी 41, आष्टी 34, पाटोदा 24, शिरूर कासार 7, वडवणी 5, धारूर 4, गेवराई, केज प्रत्येकी 21, माजलगाव 20 असे रूग्ण आढळून आले आहेत.

3
4
5
6
7
8
9