बीड

जिल्हा परिषद उपअभियंता व लेखापालास सहा हजाराची लाच घेताना अटक

By Karyarambh Team

March 31, 2021

माजलगाव : रस्त्याच्या झालेल्या कामाचे बिल काढण्यासाठी सहा हजार रुपयाची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या उपअभियंता हिरामण गालफाडे व लेखापाल रमेश मिठेवाड यास बुधवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.माजलगाव येथील जिल्हा परिषदेच्या कार्यालयात दुपारी चारच्या सुमारास कारवाई करण्यात आली.माजलगाव येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने मतदार संघातील हिंगणी बुद्रुक या गावातील रस्त्याचे व नालीचे बांधकामाचे पूर्ण झाले होते मात्र याचे बिल देण्यासाठी संबंधित ठेकेदाराला उपअभियंता गालफाडे हे बारा हजार रुपये टक्केवारी मागत होते परंतु काम केले असल्याने टक्केवारी देण्यास ठेकेदाराने असमर्थता दाखवत सहा हजार रुपये देतो असे म्हणून तडजोड केली त्यानंतर बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ठेकेदाराने तक्रार दाखल केली त्यानुसार बुधवारी दुपारी पंचायत समिती आवारात असलेल्या जिल्हा परिषद बांधकाम विभागात लेखापाल मिठेवाड व गालफाडे यांना सहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले ही कारवाई उपाअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्या नेत्रत्वाखाली सखाराम घोलप, अमोल बागलाने, विजय बरकसे यांनी केली. याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यातआला आहे.