atyachar

राष्ट्रवादीच्या नेत्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा महाराष्ट्र

मुंबई : राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा खळबळजनक आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला आहे. फेसबूक पोस्टच्या माध्यमातून तृप्ती देसाईंनी हा दावा केला. पीडितेसह पत्रकार परिषद घेत नेत्याचं बिंग फोडण्याचा इशाराही देसाईंनी दिला आहे.
एका राष्ट्रवादीच्या नेत्याकडून लग्नाच्या, नोकरीच्या अमिषाने एका महिलेवर लैंगिक अत्याचार तृप्ती देसाई यांची बारा वाजता पीडितेसह पत्रकार परिषद अशी फेसबुक पोस्ट लिहून तृप्ती देसाई यांनी राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडवून दिली आहे. त्या नेमक्या कोणत्या नेत्यावर आरोप करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. यापूर्वी सामाजिक कल्याण मंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यासारख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले होते. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या आयुष्यातील महिलेविषयी जाहीर वाच्यता केली. तर त्यांच्याविरोधात आरोप करणार्‍या महिलेने ही तक्रार नंतर मागे घेतली. दुसरीकडे, शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावरही गंभीर आरोप झाले होते. एका तरुणीच्या आत्महत्येनंतर राठोड संशयाच्या भोवर्‍यात अडकले होते. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारण्याचा निर्णय घेतला. मात्र दोघा मंत्र्यांवरील आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं होतं.

Tagged