Corona

कोरोना अपडेट

बीड जिल्हा; 383 पॉझिटिव्ह

By Keshav Kadam

April 02, 2021

बीड : लॉकडाऊन असुनही कोरोना रूग्णसंख्या वाढतच आहे. शुक्रवारी प्राप्त झालेल्या कोरोनाचा आकडा चारशेच्या घरात आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमाचे पालन करणे गरजेचे आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या माहितीनुसार, जिल्हा प्रशासनाला शुक्रवारी 2 हजार 679 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 383 अहवाल पॉझिटिव्ह तर 2 हजार 296 इतके अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात सर्वाधिक बीड तालुक्यात 108, अंबाजोगाई 84, आष्टी 39, धारूर 16, गेवराई 3, केज 38, माजलगाव 19, परळी प्रत्येकी 18, पाटोदा 29, शिरूर 10, वडवणी 9 असे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना अटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी घरातच राहावे व कोरोना नियमाचे पालन करावे असे अवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

1
2
3
4
5
6
7
8
9
10
11