मुंबई : राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड समोर आली आहे. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी 100 कोटी रूपये वसुलीचा आरोप केल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृह मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.
ते म्हणाले की, उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शरद पवार यांना भेटून राजीनामा देणार असल्याची माहिती दिली. पवारांनी यासाठी होकार दिला आहे. राजीनामा सोपवण्यासाठी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे रवाना झाले आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. दरम्यान, या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाव समोर येत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्र्यांकडे पदभार जाणार असल्याची ही माहिती मलिक यांनी दिली आहे.
अनिल देशमुख यांचे राजीनामा पत्र