क्राईम

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने तहसीलदारांच्या गाडीला दिली धडक

By Keshav Kadam

April 06, 2021

बीड दि. 6 : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने तहसीलदार यांच्या गाडीला धडक दिली. ही घटना मंगळवारी (दि.6) सकाळी घडली. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून अन्य एक फरार आहे. बीड तालुक्यातील ढेकनमोहा परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर तहसीलदार शिरीष वमने यांनी अडविला. मात्र ट्रॅक्टर चालकाने थेट तहसीलदार यांच्या गाडीला ट्रॅक्टरची धडक दिली. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून एक जण फरार झाला आहे. पुढील तपास पिंपळनेर पोलीस करत आहेत.