collector jagtap

‘या’ आवश्यक सेवांना मिळाली परवानगी

बीड

जिल्हा प्रशासनाच्या आदेश

बीड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ४ एप्रिल रोजी ‘ब्रेक दि चेन’च्या आदेशात ज्या आवश्यक सेवांचा उल्लेख होता, त्यात आणखी काही सेवांचा समावेश सोमवारी राज्य सरकारने केला आहे. त्याअनुषंगाने आज (दि.६) जिल्हा प्रशासनाकडून आदेश आले आहेत.

या आवश्यक सेवांना मिळाली परवानगी

पेट्रोल पंप, पेट्रोलियम संबंधित उत्पादने,सर्व प्रकारच्या कार्गो सेवा,डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी -माहिती तंत्रज्ञान सबंधित महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि सेवा, शासकीय व खासगी सुरक्षा सेवा, फळविक्रेते

खालील खासगी आस्थापना व कार्यालये सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीत सुरु ठेवण्यास परवानगी दिली. मात्र कर्मचाऱ्यास लसीकरण बंधकारक आहे. जोपर्यंत लसीकरण होत नाही तोपर्यंत दर १५ दिवसांचे कोरोना निगेटिव्ह आरटीपीसीआर प्रमाणपत्र बाळगावे लागेल. १० एप्रिलपासून याची अंमलबजावणी केली जाईल आणि नियम तोडणाऱ्या व्यक्तींकडून १ हजार रुपये दंड घेण्यात येईल.

ह्या खासगी आस्थापना व कार्यालये सुरू करणार

सेबी तसेच सेबी मान्यताप्राप्त संस्था जसे की स्टॉक मार्केट, डिपॉझिट आणि क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स, रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखालील संस्था, प्राथमिक डीलर्स, सीसीआयएल, एनपीसीआय, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स, सर्व नॉन बँकिंग वित्तीय महामंडळे, सर्व मायक्रो फायनान्स संस्था, सर्व वकिलांची कार्यालये, कस्टम हाऊस एजंट्स, परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर (लस/औषधी/जीवनरक्षक औषधांशी संबंधित वाहतूक)

प्रवाशांना तिकीट सोबत ठेवावे लागणार
ज्या व्यक्ती रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत रेल्वे, बसेस, विमाने यातून आगमन किंवा प्रस्थान करणार असतील त्यांना अधिकृत तिकिट बाळगावे लागेल जेणेकरून तो संचार बंदीच्या कालावधीत स्थानकांपर्यंत किंवा घरी प्रवास करू शकेल.

औद्योगिक कामगारांना त्यांच्या ओळखपत्राच्या आधारे रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत कामाच्या पाळ्यानुसार ये जा करता येईल.

परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यास रात्री ८ नंतर घरी प्रवास करावयाचा असेल तर हॉल तिकीट बाळगावे लागेल.

आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार आणि रविवारी विवाह समारंभ असेल तर स्थानिक प्रशासन त्यासंदर्भात परिस्थिती पाहून आणि नियमांचे पालन करण्याच्या अटींवर परवानगी देईल.

घरगुती काम करणारे कामगार, वाहन चालक, स्वयंपाकी यांच्या रात्री ८ नंतर ये-जा करण्याच्या बाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण परिस्थितीनुरूप निर्णय घेईल.

Tagged