बीड दि.7 : जिल्ह्यात कोरोनाचा बुधवारी (दि.7) कालच्या तुलनेत थोडे दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. जिल्ह्यात 580 पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, 3 हजार 529 अहवाला प्राप्त झाले असून त्यापैकी 2 हजार 949 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 580 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. यात बीड तालुक्यात सर्वाधिक 146, अंबाजोगाई तालुक्यात 114, आष्टी 71, धारूर 15, गेवराई 36, केज 50, माजलगाव 39, परळी 60, पाटोदा 18, शिरूर कासार 21, वडवणी 10 असे रूग्ण आढळून आले आहेत.