मुुंबई : मनसुख हिरेन हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन वाझे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरील आरोपांना दुजोरा दिला आहे. दरमहा 100 कोटी वसूल करण्याचे लक्ष्य मिळाले होते आणि हे लक्ष्य तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले होते असा आरोप सचिन वाझेने केलाय. या प्रकरणात सचिन वाझेने शरद पवार यांचे नाव घेतलंय. शरद पवारांना मी नको होतो. त्यांना मनवण्यासाठी अनिल देशमुख यांनी माझ्याकडे 2 कोटींची मागणी केली होती असे सचिन वाझेने लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. हे पत्र सचिन वाझेने कोर्टात दिलंय.सचिन वाझेने लिहिलेल्या पत्रानुसारस मी 6 जून 2020 रोजी पुन्हा ड्युटीवर आलो. माझ्या कर्तव्यात सामील होण्याने शरद पवार खूश नव्हते. अशा परिस्थितीत शरद पवार यांनी माझे पुन्हा निलंबन करण्यास सांगितले. हे स्वत: अनिल देशमुख यांनी मला सांगितले. पवार साहेबांना पटवून देण्यासाठी त्यांनी माझ्याकडे 2 कोटी रुपयांची मागणी केली होती. पण एवढी मोठी रक्कम देणे मला शक्य नव्हते. ऑक्टोबर 2020 मध्ये अनिल देशमुख यांनी त्यांना सह्याद्री अतिथीगृहात आमंत्रित केले. पण त्याआधी जुलै-ऑगस्ट 2020 मध्ये अनिल परब यांनी त्यांना सरकारी बंगल्यात बोलावले होते. त्याच आठवड्यात डीसीपी पदासाठी अंतर्गत आदेशही देण्यात आले होते.सचिन वाझेने पत्रात पुढे म्हटलंय की, बैठकीत अनिल परब यांनी मला सैफी बुर्हाणी ट्रस्टच्या तक्रारीकडे लक्ष देण्यास सांगितले. जे प्री-प्राइमरी स्टेजवर होते. तसेच चौकशी बंद करण्यासाठी मला एसबीयूटीच्या विश्वस्तांशी करार करण्यास सांगितले गेले. आणि यासाठी 50 कोटी रुपयांची मागणी करण्यास सांगितले. त्यांनी मला पैशांसाठी सुरुवातीची बोलणी करण्यास सांगितले, परंतु मी असे करण्यास नकार दिला कारण मी बुर्हाणी ट्रस्टमधील कोणालाही ओळखत नाही आणि या चौकशीशी माझा काही संबंध नव्हता. जानेवारी 2020 मध्ये मंत्री अनिल परब यांनी मला पुन्हा त्यांच्या सरकारी बंगल्यात बोलावले, बीएमसीमध्ये लिस्टेड झीर्रीर्वीश्ररपीं कंत्राटदाराविरूद्ध चौकशी संभाळण्यास सांगितले. मंत्री अनिल परब यांनी यादी दिलेल्या 50 कंपन्यांमधून प्रत्येक कंपनीतून 2 कोटी रुपये घेण्यास सांगितले. एका तक्रारीवरुन या कंपन्यांविरुद्ध चौकशी सुरु होती. जानेवारी 2021 मध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला त्यांच्या सरकारी बंगल्यावर बोलावले. त्यांचा पीए कुंदन तिथे हजर होता. त्याचवेळी मला मुंबईतील 1650 पब, बार आणि दरमहा 3 लाख रुपयांचे कलेक्शन करण्याचे टार्गेट दिले गेले असे वाझेने पत्रात लिहिलंय.मी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सांगितले की शहरात1650 बार नव्हे तर 200 बार आहेत. अशा प्रकारे पैसे गोळा करण्यास मी देशमुख यांना नकार दिला. कारण हे माझ्या क्षमतेच्या पलीकडे आहे. मग गृहमंत्र्यांच्या पी.ए. कुंदन यांनी मला सांगितले की मला जर नोकरी आणि पद वाचवायचे असेल तर गृहमंत्री जे म्हणत आहेत ते करावे लागेल. यानंतर मी ही बाब तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग यांना सांगितली. आणि असंही म्हटलं होतं की येत्या काळात मला कोणत्या ना कोणत्या विरोधाभासात अडकवण्यात येईल. यानंतर तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग यांनी मला कोणत्याही बेकायदेशीर वसुलीमध्ये भाग घेण्यास नकार दिला असे सचिन वाझेने म्हटलंय. या आरोपांवर बोलण्यासाठी अनिल देशमुख पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यावेळी ते काय म्हणतात हे पाहणे महत्वाचे आहे.